चालु घडामोडी

संक्षिप्त चालू घडामोडी 


नवनव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी 'नासा'ने सोडलेल्या केप्लर या यानाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, या यानाने जीवसृष्टीची शक्यता असलेल्या आठ नव्या ग्रहांचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, यातील दोन ग्रहांचे पृथ्वीशी खूपच साम्य असून, त्यांचा पृष्ठभागही पृथ्वीसारखा खडकाळ आहे. शक्तिशाली दुर्बिण असणाऱ्या केप्लरचे मार्च 2009 मध्ये प्रक्षेपण केले होते. या यानाच्या निरीक्षणांना या वर्षात सुरुवात झाली.

पृथ्वीशी साम्य असणाऱ्या दोन ग्रहांना केप्लर- 438 बी आणि केप्लर-442 बी अशी नावे देण्यात आली आहेत. हे दोन्ही ग्रह सूर्यापेक्षा छोट्या आणि कमी तापमान असलेल्या 'रेड ड्वार्फ' गटातील ताऱ्यांभोवती फिरत आहेत.


गांधीनगर येथे प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी भारतात परतल्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन टपाल तिकिटांच्या संचाचे विमोचन केले. टपाल विभाग, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या तिकिटांचे संच तयार केले आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे "दांडी कुटीर" या संग्रहालयाचे उदघाटन केले. तीन मजल्यांच्या डोमच्या आकारातील या वास्तूमध्ये महात्मा गांधींची विविध रुपे दाखवली आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख घटनांचे दृक-श्राव्य सादरीकरण देखील आहे.


सचिन तेंडुलकर लवकरच चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.

सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटात खुद्द सचिन भूमिका करणार आहे. चित्रपटासाठी मुंबई स्थित '200 नॉट आऊट' ही निर्मिती संस्था काम करत आहे तर ब्रिटीश लेखक जेम्स एरस्किने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिनने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 हजार 357 धावा केल्या आहेत.


महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचा समावेश असलेले राज्य विद्यापीठ परीक्षा मंडळ स्थापणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या धर्तीवर विद्यापीठ परीक्षा मंडळ स्थापण्यात येईल.


संक्षिप्त चालू घडामोडी 8 जानेवारी 2015

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 6 जानेवारी 2015 पासून नागरिकत्व (सुधारणा) कायदा 2015  त्वरित लागू केला आहे. या अंतर्गत भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत:

सध्या भारतीय नागरिकत्वासाठी भारतात सलग एक वर्ष राहणे अनिवार्य आहे, मात्र केंद्र सरकारला हरकत नसल्यास  विशेष परिस्थितीत  यात सूट देता येऊ शकते. ज्‍यांचे पालक भारतीय नागरिक आहे, त्या अल्पवयीन बालकांना प्रवासी भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करण्यासाठीच्या अटींमध्ये शिथिलता अशा नागरिकांची मुले, नातवंडे किंवा पतवंडे  यांना प्रवासी भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार.

कलम 7 अ अंतर्गत नोंदणीकृत प्रवासी भारतीय यांचे पती किंवा पत्नी किंवा भारतीय नागरिकाचे पती किंवा पत्नी यांना प्रवासी भारतीय  म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार असेल.


उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्समधील पॅरीस येथील  चार्ली हेबडो मासिकाच्या कार्यालयात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 12 जणांना प्राणाला मुकावे लागले. याच मासिकाच्या कार्यालयावर 2011 मध्येही हल्ला करण्यात आला होता. दहशतवादी हल्ल्यामध्ये चार्ली हेबदो या फ्रेंच मासिकाचे संपादक स्टीफन शारबोनियर हे ही बळी पडले आहेत. त्याखेरीज मासिकाचे मुख्य व्यंगचित्रकारही ठार झाले.  कैलाश सत्यर्थी यांनी त्यांचे नोबेल पदक राष्ट्राला समर्पित केले, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदक सुपूर्त केले. 


सत्यर्थी यांचे नोबेल पदक सर्वसामान्य जनतेलाही बघता यावे यासाठी ते पदक राष्ट्रपती भवनाच्या संग्रहालयात ठेवणार आहेत. बरखास्त झालेल्या नियोजन आयोगाच्या सचिव सिंधुश्री खुल्लर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात येणार आहे.


1975 च्या तुकडीच्या IAS असलेल्या खुल्लर यांनी एप्रिल 2012मध्ये नियोजन आयोगाच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती. 31 मार्च 2013 रोजी निवृत्तीनंतर त्यांची दोन वर्षांसाठी आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.


आता नियोजन आयोग बरखास्त केल्यानंतर त्यांची नीती आयोगाच्या सचिवपदीही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी नागपूर आयआयएमला मंजुरी दिल्याचे वृत्त आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर अल्विरो पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.


आरबीआयने आर्थिक घोटाळ्यांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी को- ऑपरेटीव्ह बँकांना पॅनल स्थापन करण्यास सुचवले आहे. ग्रामीण भागात शौचालय बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ करण्यात आली आहे.

Popular posts from this blog

शालेय कार्यालयीन कागदपत्रॆ /प्रपत्रॆ/तक्ते/वेळापत्रक /अर्ज / वार्षिक- मासिक नियोजन इ. डाउनलोड करा

शालेय अभ्यासक्रम

प्रश्नपेढी/संच